परतीच्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतमालाचे तात्काळ पंचनामे करा .केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाला दिले निर्देश .

0
Spread the love

बुलढाणा समाचार 

बुलढाणा  परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानीचे पंचनामे त्वरित करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला केंद्रीय आयुष आरोग्य कडुंब कल्याण राज्यमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी दिले आहेत

गेल्या आठवड्याभरामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये परतीचा पाऊस सतत पडत आहे काल रात्री मोठ्या प्रमाणात पावस झाल्यामुळे कपाशी , तूर , हरभरा ,केळी या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश केंद्रीयमंत्री तथा बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांनी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधून त्यांना त्वरित पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत .. शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या गावच्या कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून झालेल्या नुकसानीची माहिती द्यावी असे आवाहन केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयातून करण्यात आले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed