अकोला हायवेला भीषण अपघात दोन गायी मृत्युमुखी तर एक जिवंत

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

दिनांक 06/02/2026

खामगांव :- अकोला हायवे रोडवर अकोल्याला जात असलेल्या भरधाव वेगात एका ट्रक चालकाने तीन गायीला चिरडत नेले ही घटना ईतकी दर्दनाक होती की एका गायीचे मुंडके चार ही पाय आणि पोट पूर्णपणे फुटून गायीचा चुराडा झाला होता. सविस्तर हकीकत अशी आहे की अकोला हायवे रोडवर काल दिनांक 5 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी 5 वाजेच्या जवळपास एका ट्रक चालकाने निष्काळजी पणे दोन गायीला चिरडले तर एका गायीला गंभीर जखमी करून पोबारा केला रस्त्यावर ये जा करणाऱ्या कोणीच लोकांनी गायीचे प्रेत उचलून बाजूला केले नाही व तसेच एका जिवंत गायीला पण कोणी उचलले नाही खामगांव वरून अकोल्याला एकनिष्ठा गौ सेवा रक्तसेवा फाउंडेशन चे गौ सेवक सुरजभैय्या यादव, अमोल तायडे, मनोज यादव, विरेंद्र पिल्ले, यश येळवे, दर्शन भगत, अर्पण यादव, शुभम माकोडे, गणेश सोसे, वैभव पवार, अंकुश माकोडे, गोविंद यादव आदि गौ सेवकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दोन गायीला रस्त्याच्या बाजूला सुखरूप नेऊन ठेवले व दुसऱ्या जिवंत असलेल्या गायीला पण रोडच्या बाजूला नेऊन ठेवले व लगेच गौ धारक ओबीसी नेते गणेश चौकसे यांना घटनेची माहिती सुरजभैय्या यादव यांनी फोनद्वारे दिली व गायी त्यांच्या फॉर्म हाऊस समोर नेले या दुर्दैवी भीषण अपघातात दोन गायीला आपला जीव गमवावा लागला तर एकीला कंबरेत गंभीर दुखापत झाली. अशी माहिती मनोज यादव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed