बुलढाणा : राज्यस्तरीय विज्ञान स्पर्धेत रिदा अबरार खान हिचा प्रथम क्रमांक

बुलडाणा समाचार
St. Joseph English High School, बुलढाणा येथील इयत्ता नववीची विद्यार्थिनी कु. रिदा अबरार खान (वय १४ वर्षे) हिने महाराष्ट्र राज्यस्तरीय विज्ञान मॉडेल निर्मिती स्पर्धा २०२६ मध्ये प्रथम क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
ही स्पर्धा दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी Shivaji Science College, चिखली येथे उत्साहात पार पडली. राज्यभरातून ४०० हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता, तर २०० पेक्षा अधिक विज्ञान मॉडेल्स सादर करण्यात आली होती.
कु. रिदा हिने “AI स्मार्ट मिरर असिस्टंट” या आपल्या प्रकल्पासाठी हा मानाचा प्रथम पुरस्कार मिळवला. तिचे मॉडेल अत्यंत नवोन्मेषी, व्यावहारिक आणि उपयुक्त असल्याचे परीक्षकांनी नमूद केले. स्पर्धेतील निर्णायक मंडळ तसेच उपस्थित प्रेक्षकांनी तिच्या प्रकल्पाचे भरभरून कौतुक केले.
रिदाच्या या यशामुळे विद्यालय, पालकवर्ग तसेच संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
