Spread the love

 

बुलडाणा समाचार

बुलढाणा शहरातील जोहर नगर उर्दू स्कूलच्या मागील परिसरात एका आवारा कुत्र्याने समायरा नासिर खान या लहान मुलीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित आवारा कुत्र्याने अचानक मुलीच्या चेहऱ्यावर झडप घालत चावा घेतला. सुदैवाने त्या ठिकाणी काही नागरिक उपस्थित होते. त्यांनी तातडीने धाव घेत मुलीची सुटका केली आणि पुढील अनर्थ टाळला. जखमी मुलीला तत्काळ वैद्यकीय उपचारासाठी मिर्जा डॉक्टर जुनैद रुग्णालयात दाखल करण्यात आले.

स्थानिक नागरिकांनी सांगितले की, परिसरात आवारा कुत्र्यांचा मोठ्या प्रमाणावर वावर असून याबाबत वारंवार नगरपालिका प्रशासनाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. आवारा कुत्रे मोकाट फिरत असून बकरीच्या पिल्लांपासून ते लहान मुलांपर्यंत हल्ल्याच्या घटना घडत आहेत, असा आरोप नागरिकांनी केला आहे.

या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये संताप आणि भीतीचे वातावरण असून, नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून आवारा कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed