तीन सख्ख्या भावांची पोलीस दलात निवड जळगावच्या आदिवासी शाळेचा गौरव

जळगाव, – सपकाळ आदिवासी आश्रम शाळेतील चार विद्यार्थ्यांची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली असून, त्यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे त्यापैकी तीन सख्खे भाऊ आहेत.
राम योगीराज सोनने (कोल्हापूर), शाम योगीराज सोनने (छत्रपती संभाजीनगर) आणि हिरालाल योगीराज सोनने (सातारा) या तिघा भावांनी पोलीस प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर सेवेत रुजू झाले आहेत. त्यांच्यासोबतच पवन अशोक दांडगे (कोल्हापूर) याचीही निवड झाली आहे.
या यशाबद्दल माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, आमदार संतोष दानवे, आमदार संजना जाधव, प्रकल्प अधिकारी चेतना मोरे व इतर अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे. मुख्याध्यापक ए.ए. सोनवणे यांच्यासह शिक्षक व प्रशासनातील विविध अधिकारी, ग्रामस्थ आणि मित्रपरिवार यांनीही या विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव केला आहे.
हा प्रसंग जळगाव जिल्ह्याच्या शिक्षणप्रेमी संस्कृतीला व आदिवासी समाजाच्या प्रगतीला चालना देणारा ठरला आहे.
