शिक्षक व पदवीधर मतदार संघांच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

मुंबई, दि. 8 – भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर व औरंगाबाद विभागातील पदवीधर मतदार संघ, तसेच पुणे व अमरावती विभागातील शिक्षक मतदार संघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठी मतदार याद्या नव्याने तयार करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, 6 नोव्हेंबर 2025 पर्यंत पात्र पदवीधर आणि शिक्षकांकडून अनुक्रमे प्रपत्र 18 व 19 मध्ये प्राप्त झालेल्या अर्जांवर संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी पात्रता-अपात्रतेचा निर्णय घेतील. त्यानुसार 25 नोव्हेंबर 2025 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येतील.

यानंतर 25 नोव्हेंबर ते 10 डिसेंबर 2025 या कालावधीत नागरिकांना या यादीविषयी दावे व हरकती सादर करण्याची संधी मिळेल. तसेच, 6 नोव्हेंबरनंतरही पदवीधर आणि शिक्षकांना प्रपत्र 18 व 19 द्वारे मतदार नोंदणी करण्याची मुभा असेल.

10 डिसेंबर 2025 पर्यंत प्राप्त झालेल्या अर्जांवर विचार करून 30 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed