देऊळघाट येथे विहिरीत इसमाचा मृतदेह आढळला

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

देऊळघाट प्रतिनिधी गनी खान

बुलढाणा (ता. ९ नोव्हेंबर) बुलढाणा तालुक्यातील देऊळघाट येथे आज सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास एका इसमाचा मृतदेह विहिरीत तरंगताना आढळून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देऊळघाट बसथांब्याच्या मागील बाजूस असलेल्या पैनगंगा नदीकाठी असलेल्या विहिरीत हा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली.

सूचना मिळताच बुलढाणा ग्रामीण पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवला.

मृताची ओळख मोहम्मद शरीफ प्यार मोहम्मद (वय ४९)अशी झाली आहे. ते मूळचे मलकापूर येथील रहिवासी असून, मागील काही काळापासून देऊळघाट येथे वास्तव्यास होते.

या प्रकरणी बुलढाणा ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed