जुलै महिन्यात धाड पोलिसांची वाहतूक नियमभंगाविरुद्ध धडक कारवाई; १३५ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई

0
Spread the love

 

बुलडाणा समाचार 

बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशन धाड यांनी वाहतूक नियमांचे पालन व्हावे, रस्ते अपघातांना आळा बसावा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जुलै २०२६ महिन्यात विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम राबविली.

सदर मोहिमेदरम्यान विविध वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १३५ वाहनचालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली असून एकूण ₹७५,७००/- इतका दंड वसूल करण्यात आला.

कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे आहे :

सार्वजनिक रस्त्यावर अडथळा निर्माण करणे / वाहन अयोग्य पद्धतीने उभे करणे – ६१ कारवाया

पोलिसांच्या हातवाऱ्याकडे दुर्लक्ष करणे – २३ कारवाया

वाहन चालविण्याचा वैध परवाना (Driving Licence) सादर न करणे – १७ कारवाया

राँग साईडने वाहन चालविणे – १४ कारवाया

मद्यप्राशन करून वाहन चालविणे – ६ कारवाया

ट्रिपल सीट वाहन चालविणे – ५ कारवाया

क्रमांक फलक नसलेले वाहन चालविणे – २ कारवाया

सीट बेल्टचा वापर न करणे – ३ कारवाया

धोकादायक पद्धतीने वाहन चालविणे – ३ कारवाया

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक – १ कारवाई

पोलीस स्टेशन धाड यांच्याकडून सर्व वाहनचालकांना आवाहन करण्यात येते की, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, वाहनाची सर्व आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगावीत, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये तसेच दुचाकीस्वारांनी हेल्मेट आणि चारचाकी वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर अनिवार्यपणे करावा. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही सातत्याने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.

सदरची विशेष वाहतूक अंमलबजावणी मोहीम व दंडात्मक कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे (IPS), माननीय अपर पोलीस अधीक्षक श्री. अमोल गायकवाड तसेच माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन धाडचे ठाणेदार सपोनि अजिनाथ मोरे यांच्या नेतृत्वाखाली राबविण्यात आली. सदर कारवाई यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी ट्रॅफिक अमलदार पोलीस कॉन्स्टेबल कुमोद जाधव व पोलीस कॉन्स्टेबल देवेंद्र मुळे यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *