बुलढाणा पोलीस मुख्यालयात १५० विविध प्रजातींच्या वृक्षांचे वृक्षारोपण

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

बुलढाणा, दि. २ ऑगस्ट : “हिरवी पृथ्वी, निरोगी सृष्टी” या संकल्पनेला मूर्त स्वरूप देत बुलढाणा पोलीस मुख्यालय परिसरात रविवारी वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणाबरोबरच वृक्षांचे संगोपन आणि संवर्धन करणे ही काळाची गरज असल्याचे सांगितले. प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घेऊन अधिकाधिक वृक्ष लागवड करावी, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान पोलीस मुख्यालय परिसरात आवळा, आंबा, चिंच, बांबू, गुलमोहर, पाम आदी विविध प्रजातींच्या एकूण १५० वृक्षांची लागवड करण्यात आली.

या कार्यक्रमाला अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, प्रभारी पोलीस उपअधीक्षक (गृह) बाळकृष्ण पावरा, राखीव पोलीस निरीक्षक विकास तिडके तसेच पोलीस मुख्यालयातील अधिकारी, कर्मचारी आणि नवप्रविष्ट पुरुष व महिला पोलीस शिपाई मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *