मुंबईत मुस्लिम जिमखाना येथे एकदिवसीय धोरण नियोजन कार्यक्रम संपन्न

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

मुंबई, दि. ८ जून २०२६ : मुंबई येथील मुस्लिम जिमखाना येथे एकदिवसीय धोरण नियोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्राच्या नेतृत्वाची भूमिका, भारतीय गणराज्याच्या मूल्यांचे संरक्षण तसेच अल्पसंख्याक मुस्लिम समाजासमोरील विविध प्रश्न आणि आव्हानांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

कार्यक्रमास उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती दीपसे सर, उच्च न्यायालयाच्या वकील अॅड. लारा जस्सानी, मौलाना अब्दुल्ला आझमी, मौलाना उमरैन महफूज रहमानी, आमदार अबू आसिम आझमी, आमदार रईस शेख, आमदार हारून पठाण, आमदार अमीन पटेल, आमदार साजेद पठाण, आमदार आरेफ नसीम तसेच आमदार सना मलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. याशिवाय राज्यभरातील विविध सामाजिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रातील जबाबदार पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीत विविध सामाजिक, शैक्षणिक आणि राष्ट्रीय विषयांवर सकारात्मक वातावरणात चर्चा झाली. सर्व उपस्थितांनी सामाजिक सलोखा, राष्ट्रीय एकात्मता आणि गंगा-जमुनी संस्कृतीच्या जतनासाठी कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. हिंदू-मुस्लिम ऐक्य अधिक दृढ करण्यासाठी संयुक्त प्रयत्नांची आवश्यकता असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

या कार्यक्रमास बुलढाणा जिल्ह्यातून विशेष उपस्थिती म्हणून अश्फाक हाजी शब्बीर बागबान (अध्यक्ष, बागबान बिरादरी बुलढाणा), हाफिज मुजाहिद साहेब (बुलढाणा), शहादत बेग साहेब (बुलढाणा), शेख राहील सर (भोकरदन), मुफ्ती अश्फाक साहेब (अकोला) तसेच युनुस सेठ (अकोला) उपस्थित होते.

कार्यक्रमाचा समारोप राष्ट्रहित, संविधानिक मूल्यांचे संरक्षण आणि सामाजिक सौहार्द वृद्धिंगत करण्याच्या सामूहिक निर्धारासह करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed