घिर्णी यथे संत रविदास महाराज यांची 649 वी जयंती उत्साहात साजरी

बुलडाणा समाचार
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
तालुक्यातील ग्राम घिर्णी येथे संत रविदास महाराज जयंती दरवर्षी माघ पौर्णिमेला श्रद्धेने आणि भक्तीने साजरी केली जाते. त्यांच्या कृती, विचार आणि भक्तीद्वारे संत रविदासांनी समाजातील असमानता आणि भेदभावाच्या प्रचलित कल्पनांना आव्हान दिले.
संत रोहिदास महाराज यांची जयंती सकाळी ग्रामपंचायत कार्यालय घिर्णी येथे साजरी करण्यात आल या ठिकाणी समाजातील मान्यवर तसेच सरपंच माझी सरपंच, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य, तसेच इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते
संत रविदास महाराज यांच्या बद्दल थोडक्यात माहिती अशी की गुरु रविदास (१३७७-१५२७ इ.स.) यांना रैदास, रोहिदास आणि रुहिदास अशा विविध नावांनी ओळखले जाते. ते भक्ती चळवळीचे एक प्रसिद्ध संत होते. त्यांच्या भक्तीगीतांचा आणि पदांचा भक्ती चळवळीवर खोलवर प्रभाव होता. इतिहासकारांच्या मते, त्यांचा जन्म इ.स. १३७७ मध्ये भारतातील उत्तर प्रदेशातील वाराणसीतील मंधुदेव येथे झाला. काही विद्वान गुरु रविदासांचा जन्म १३९९ मध्ये मानतात. त्यामुळे गुरु रविदासांच्या नेमक्या जन्मतारखेबाबत वाद आहे. हिंदू कॅलेंडरनुसार त्यांचा जन्म माघ पौर्णिमेला झाला होता. त्यामुळे त्यांची जयंती हिंदू चंद्र कॅलेंडरनुसार माघ पौर्णिमेला साजरी केली जाते.
