राज्य परिवहन विभागातर्फे बुलडाणा येथे रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रक्तदान व नेत्र तपासणी शिबिर संपन्न

बुलडाणा समाचार
बुलडाणा येथे राज्य परिवहन विभागाच्या वतीने रस्ता सुरक्षा अभियानाच्या निमित्ताने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या अभियानाअंतर्गत बुलडाणा येथील उप प्रादे परिवहन अधिकारी कार्यालयात संपूर्ण आठवडाभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमांच्या अनुषंगाने आज रक्तदान शिबिर तसेच नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास राज्य परिवहन विभागातील कर्मचारी तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेषतः महिला व पुरुषांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.
यावेळी रस्ता सुरक्षा साप्ताहानिमित्त नागरिकांनी वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले. रस्ता अपघात टाळण्यासाठी नियमांचे पालन करणे अत्यंत आवश्यक असल्याचेही यावेळी उपस्थितांना सांगण्यात आले.
