बुलढाण्यात माजी नगरसेवक आकाश दळवींचं आंदोलन; नगरपरिषदेच्या दुर्लक्षाविरोधात कचरा फेकून निदर्शन


बुलढाणा शहरातील वाढत्या अस्वच्छतेकडे आणि नगरपरिषदेच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक आकाश दळवी यांनी अनोखा आंदोलन केलं आहे. शहरातील विविध ठिकाणी जमा झालेला कचरा त्यांनी स्वतः रिक्षामध्ये भरून नगरपरिषदेच्या मुख्य द्वारासमोर फेकला.
आकाश दळवी यांनी सांगितले की, “बुलढाणा हे शांतप्रिय शहर आहे. मात्र, नगरपरिषदेच्या निष्क्रियतेमुळे शहरातील स्वच्छतेचा बोजवारा उडाला आहे. नागरिकांच्या आरोग्याशी खेळ केला जात आहे. प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठीच हे आंदोलन केले आहे.”
ते पुढे म्हणाले, “मी नेहमीच जनतेच्या हितासाठी उभा राहिलो आहे, उभा आहे आणि पुढेही उभा राहणार आहे. जर प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलें नाही, तर यापेक्षाही मोठा जनआंदोलन उभारलं जाईल.”
काहींनी या कृतीला ‘राजकीय स्टंट’ म्हटले असले तरी, दळवी यांनी स्पष्ट केले की त्यांचा उद्देश केवळ जनहिताचाच आहे. “लोक मला प्रसिद्धीसाठी हे करत आहे असे म्हणतील, पण मी जनतेच्या समस्यांसाठी लढतोय. नगरपरिषदेने झोपेतून जागं व्हावं म्हणून हे पाऊल उचले” असंही त्यांनी सांगितले
आकाश दळवी यांच्या या आंदोलनामुळे नगरपरिषदेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांकडूनही स्वच्छतेच्या विषयावर चर्चा रंगू लागली आहे.
बुलडाणा समाचार चे कैमेरा समोर आकाश दळवींनी आपली भूमिका मांडली
