रब्बी हंगामासाठी प्रमाणित बियाणे वितरणास सुरुवात शेतकऱ्यांना लाभ घेण्याचे आवाहन

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

बुलडाणा, दि. 17 अन्न सुरक्षा व पोषण अभियानांतर्गत सन 2025-26 या वर्षातील रब्बी हंगामासाठी अन्नधान्य, कडधान्य व पौष्टिक तृणधान्य पिकांच्या प्रमाणित बियाण्यांच्या वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधून वेळेत अनुदानित बियाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि कार्यालयातील तंत्र अधिकारी श्री. अजय वाढे यांनी केले आहे.

या योजनेअंतर्गत हरभरा आणि ज्वारी या पिकांसाठी अनुदानित बियाणे उपलब्ध होणार आहेत.

हरभरा (10 वर्षांआतील वाण) 2073.4 क्विंटल बियाणे, ₹50 प्रति किलो अनुदान दराने.

हरभरा (10 वर्षांवरील वाण)₹25 प्रति किलो अनुदान दराने.

ज्वारी (10 वर्षांआतील वाण)– 40 क्विंटल बियाणे,₹30 प्रति किलोअनुदान दराने.

ज्वारी (10 वर्षांवरील वाण) 170 क्विंटल बियाणे, ₹15 प्रति किलो अनुदान दराने उपलब्ध राहणार आहे.

बियाणे वितरण हे ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ (First Come, First Serve) या तत्वावर केले जाणार आहे. बियाणे वितरणासाठी महाबीज राष्ट्रीय बीज निगम, आणि कृभको या संस्थांच्या अधिकृत वितरकांमार्फत बियाणे उपलब्ध होईल.

शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीसाठी फार्मर आयडी सातबारा उतारा, आणि आधार कार्ड सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच, एका शेतकऱ्याला केवळ 1 हेक्टर क्षेत्रापुरतेच प्रमाणित बियाण्याचे अनुदान दिले जाणार आहे.

जिल्हा कृषि विभागाने शेतकरी बांधवांना वेळेत अर्ज करून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed