धक्कादायक! चिखली रोडवरील नंगारा हॉटेलजवळ 19 वर्षीय तरुणाचा खून


बुलडाणा समाचार बुलढाणा शहरातील गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांमध्ये आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दि. 1 ऑगस्ट रोजी चिखली रोडजवळील नंगारा हॉटेलसमोरील अपार्टमेंटजवळ 19 वर्षीय तरुणाचा चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला.
मृत तरुणाचे नाव सनी सुरेश जाधव (वय 19, रा. गौतम नगर, बुलढाणा) असे आहे. प्राथमिक माहितीनुसार, काही कारणांमुळे सनीचा एका तरुणासोबत वाद झाला होता. त्याच वादातून अज्ञात व्यक्तीने सनीवर पोट व छातीवर सपासप चाकूचे वार केले. या हल्ल्यात तो जागीच कोसळला आणि गंभीर रक्तस्राव झाल्यामुळे त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. पोलीस आरोपीचा शोध घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
