बडनेरा-भुसावळ मेमू पॅसेंजरमधून पडून महिलेचा मृत्यू

प्रतिनिधी – रविंद्र गव्हाळे, मलकापूर
मलकापूर : दिनांक 22 जून 2025 रोजी सकाळी अंदाजे 5.20 वाजता खुमगाव बुर्ती जवळ (रेल्वे पोल क्रमांक 517/2) एका धावत्या मेमू पॅसेंजर ट्रेनमधून पडून एका महिलेचा मृत्यू झाला.
घटनास्थळी ओमसाई फाउंडेशनचे विलास निंबोळकर, आनंद वावगे, बाळू राऊत आणि स्वयंसेवक तसेच नांदुरा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार मुन्ना सैयद हे पोहोचले. त्यांनी अॅम्ब्युलन्सद्वारे महिलेचे प्रेत सरकारी दवाखाना, नांदुरा येथे नेले.
मृत महिलेचे वय अंदाजे ३० वर्षे असून, तिच्या अंगावर ग्रे-पिंक रंगाची साडी, जांभळ्या रंगाचे ब्लाउज, आणि हातात खळ्याची अंगठी होती.
ही महिला धावत्या ट्रेनमधून कशी पडली, याचा तपास नांदुरा पोलीस ठाण्याचे पो.ह. मुन्ना सैयद करत आहेत.आहे.
