मलकापूर व मोताळा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

💥दहा दिवसांमध्ये दुसऱ्यांदा गारपीट ; शेतातील पिकासह शुभ मुहूर्तांवर निसर्ग कोपला

प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापुर

मलकापुर :- सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकरी अनेक संकटांना तोंड देत आहे . रात्रंदिवस काबाळ कष्ट करून आपल्या शेतामध्ये मोल्यवान धान्य पिकवतो परंतु त्याचा मोबदला त्याला मिळत नाही व त्याचे धान्य मातीमोल किमतीमध्ये विकल्या जाते, त्यामुळे गेल्या चार-पाच वर्षापासून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेला आहे जेव्हा निवडणुकीची वेळयते तेव्हा शेतकऱ्यावरती मोठमोठ्या योजनांचा पाऊस पडला जातो व त्याला खोट्या आश्वासनामध्ये अटकवल्या जाते यामुळेच आता शेतकरी चांगलाच हातबल झालेला आहे. त्यातच नव्याने आता निसर्ग पण शेतकऱ्यावर चांगलाच कोपला आहे ज्याप्रकारे दोन राजकीय पक्ष युती करतात त्याच प्रकारे निसर्ग आणि सरकारने सुद्धा युती केली का ? अशी पण चर्चा सध्या जोरात सुरू आहे केल्या दहा दिवसापासून जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला आहे त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुस्कान झाले आहे शेतकऱ्याच्या हाताशी आलेलं पीक डोळ्यासमोर नेस्तनाभूत होत आहे व शेतकऱ्याची आशाची निराशा होतांना डोळ्यात पाणी येत आहे हवामान खात्याने तसेच पंजाबराव डग साहेबांनी वर्तवल्यानुसार सोमवार दिनांक 30 मार्च रोजी मलकापूर व मोताळा तालुक्यामध्ये जोरदार वादळीवारासह पावसाचे आगमन होऊन शेतातील मका, ज्वारी, गहू, हरभरा, इतर पिकांचे मोठे प्रमाणात नुस्कान झाले आहे येणाऱ्या काळामध्ये अजून शेतकऱ्यासमोर मोठे संकट उभे राहणार का ?? याची पण त्याला खूप मोठी चिंता आहे.

💥 मार्च महिन्याच्या सुरुवातीला शुभ मुहूर्तांचा सुद्धा आरंभ सुरू होतो गाव खेड्यामध्ये लग्न सरायची जय्यत तयारी सुरू होते परंतु गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे शुभ मुहूर्तावर सुद्धा ईरझन पडल्याचे दिसते

ग्रामीण भागातील पूर्वीपासून सुरू असलेली परंपरा म्हणजे शुभ मुहूर्तावर जेवणासोबत लागणारे पापड, बीबळ्या, सांडोळी,कुरडई इत्यादी पदार्थ बनवण्यासाठी महिला मोठ्या संख्येने एकत्र येऊन या सर्वांची जय्यत तयारी करतात परंतु अवकाळी पावसामुळे वातावरणाच्या अनियमित्यमुळे या सर्व गोष्टींना टाळा लागला आहे व काही दिवसांनी जुनी परंपरा इतिहास जमा होते का याचीच भीती सर्वसामान्यांना आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed