देऊळघाट येथील राजू भाईंच्या संघर्षाला यश; आठवडी बाजारातील अतिक्रमण हटवले

0
Spread the love

                      बुलडाणा समाचार 

प्रतिनिधी : गनी खान

देऊळघाट (जि. बुलढाणा) : येथील आठवडी बाजार परिसरात मागील काही दिवसांपासून सार्वजनिक जागेवर अतिक्रमण करून काही जणांनी कब्जा केला होता. त्यामुळे बाजारात येणाऱ्या हजारो नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या समस्येवर अखेर तोडगा निघाला असून, राजू भाई यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे प्रशासनाने अतिक्रमण हटवण्याची कारवाई केली.

अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले होते आणि पादचाऱ्यांना चालणेही कठीण झाले होते. यामुळे अपघाताची शक्यता वाढली होती. स्थानिक नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत राजू भाई यांनी महसूल व पोलीस प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला.

आज सकाळी पोलीस बंदोबस्तात प्रशासनाने कारवाई करत सर्व अवैध अतिक्रमण हटवले. त्यामुळे बाजार परिसर व रस्ते मोकळे झाले असून नागरिक आणि ग्राहकांनी समाधान व्यक्त केले आहे.

यावेळी बोलताना राजू भाई म्हणाले, “सर्वसामान्य जनतेला त्रास देणारे अतिक्रमण हटवणे हे आमचे कर्तव्य होते. या कामात प्रशासनाने दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे आभार.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed