पनीरच्या नावाखाली ‘चीज ॲनालॉग’ खपवाल तर थेट जेलमध्ये जाल बुलढाणा अन्न व औषध प्रशासनाचे हॉटेल चालकांना आदेश; ३० एप्रिलपर्यंत मुदत

0
Spread the love
Oplus_131072

बूलडाणा समाचार 

बुलढाणा दि 13,हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये पनीरच्या नावाखाली स्वस्त आणि आरोग्यास अपायकारक ‘चीज ॲनालॉग’चा वापर करून ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या व्यावसायिकांवर आता अन्न व औषध प्रशासन (FDA) कडक कारवाई करणार आहे. पनीरऐवजी अशा पर्यायी घटकांचा वापर करणाऱ्यांनी मेन्यू कार्डवर त्याबाबत स्पष्ट उल्लेख करणे अनिवार्य असून, नियमांचे उल्लंघन केल्यास थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

जिल्ह्यातील अनेक हॉटेल, रेस्टॉरंट, कॅटरर्स आणि मिठाई विक्रेते पनीरऐवजी दिसायला पनीरसारख्याच असलेल्या ‘चीज ॲनालॉग’ (Cheese Analog) या पदार्थाचा वापर करतात. विशेष म्हणजे, हा पदार्थ बनवताना दुधाचा वापर केला जात नाही. त्याऐवजी पाम तेल, स्किम्ड मिल्क पावडर, वनस्पती तूप आणि फूड ग्रेड ॲसिटिक ॲसिड यांसारख्या घटकांचा वापर केला जातो. हा पदार्थ पनीरपेक्षा स्वस्त असल्याने नफेखोरीसाठी ग्राहकांना याची माहिती न देता तो विकला जातो, जे अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन आहे.

अन्न व औषध प्रशासनाने या संदर्भात ३० एप्रिल २०२६ पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. या मुदतीनंतर खालील गोष्टी पाळणे अनिवार्य असेल:

मेन्यू कार्डवर उल्लेख:जर हॉटेलमध्ये ‘चीज ॲनालॉग’ वापरले जात असेल, तर त्याचा स्पष्ट उल्लेख मेन्यू कार्ड, डिस्प्ले बोर्ड किंवा लेबलवर असावा.

पुरवठादारांवरही बंधन: हॉटेलला हा माल पुरवठा करणाऱ्यांनी बिलावर ‘चीज ॲनालॉग’ असा स्पष्ट उल्लेख करणे गरजेचे आहे.

पारदर्शकता:ग्राहकाला आपण काय खातोय याची अचूक माहिती देण्याची जबाबदारी संबंधित अन्न व्यावसायिकाची असेल.

 

विशेष तपासणी मोहीम:अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ च्या तरतुदीनुसार, ग्राहकांची दिशाभूल करणे हा गुन्हा आहे. या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी विभाग स्तरावर भरारी पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. “कोणत्याही परिस्थितीत ग्राहकांचे आरोग्य आणि हक्कांची पायमल्ली खपवून घेतली जाणार नाही. जे व्यावसायिक नियमांचे उल्लंघन करतील, त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,” असा इशारा सहाय्यक आयुक्त (अन्न) यांनी दिला आहे. तसेच हॉटेलमध्ये पनीरची डिश ऑर्डर करताना ती खरोखर दुधाच्या पनीरची आहे की पाम तेलाच्या ‘चीज ॲनालॉग’ची, हे तपासण्याचे आवाहनही प्रशासनाने नागरिकांना केले आह.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed