नांदुरा येथे घराच्या वादातून शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

नांदुरा (ता. नांदुरा) : घराच्या मालकी हक्काच्या वादातून एका व्यक्तीस व त्याच्या आईस शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी नांदुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रियाज खान इलियास खान (वय 28, रा. मुल्ला पुरा, नांदुरा) हे आपल्या आई शाहीना सुलताना इलियास खान यांच्यासह राहतात व शेती व्यवसाय करतात. त्यांचा आणि आरोपी अस्लम बेग कादर बेग (वय अंदाजे 40, रा. मुल्ला पुरा, नांदुरा) यांच्यात घराच्या मालकी हक्कावरून वाद सुरू आहे.

दि. 12 एप्रिल 2026 रोजी रात्री सुमारे 9.30 वाजता फिर्यादी, त्यांची आई व मित्र घरी असताना आरोपी त्यांच्या घरात आला. त्याने घर आपले असल्याचे सांगत फिर्यादीस घर सोडण्यास धमकावले. यावेळी फिर्यादीने कोर्टाच्या आदेशानुसार घराचा ताबा आपल्याकडे असल्याचे सांगण्याचा प्रयत्न केला.

मात्र, आरोपीने फिर्यादीस शिवीगाळ केली तसेच त्यांच्या आईलाही अश्लील शब्दांत अपमानित करत जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकारामुळे घाबरलेल्या फिर्यादीने नांदुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

या प्रकरणी पोलीसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 329(3), 296, 351(2), 351(3) अंतर्गत गुन्हा क्रमांक 254/2026 दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed