युवा शेतकऱ्यावर बिबट्या प्राण घातक हल्ला; मोठा अनर्थ टळला

- बुलडाणा समाचार
💥हिंसक प्राण्यांपासून शेतकऱ्याच्या संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर :- गेल्या अनेक दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनेक नागरिकांना व शेतकऱ्यांना हिंसक प्राण्यांच्या हल्ल्याने जीव गमावला आहे तसाच काहीसा प्रकार मलकापूर तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये घडला आहे . काही दिवसापासून बिबट्या दिल्याच्या अफवा येत होत्या तर काही ठिकाणी दिसला पण आणि काही शेतकऱ्यांच्या गाई म्हैस , बकऱ्या पण बिबट्याने खाल्ले परंतु आता याच्या पलीकडे जात बिबट्याने चक्क शेतकऱ्यावर हमला करून शेतकऱ्याला चांगले जखमी केले आहे तालुक्यातील ग्रामीण भागांमध्ये बिबट्याची दहशत गेल्या काही दिवसापासून पाहायला मिळत आहे तालुक्यातील पिंपळखुटा बु.येथील नितीन सुरेश मालठाणे या ग्रामस्थावर 18 जानेवारी रोजी सायंकाळी ५:३० च्या दरम्यान बिबट्याने प्राण घातक हल्ला केल्याची घटना घडली आहे त्यामुळे परिसरामध्ये शेतकरी व ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वन विभाग अंतर्गत कुठला ठोस उपाय योजना केल्या जातात याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष लागलेले आहे व शेतातील तूर हरभरा मका गहु इत्यादी पिकांच्या कामासाठी मजूर शेतात यायला तयार नसल्यामुळे एक मोठी समस्या निर्माण झाली आहे.
