⭕संत निरंकारी मंडळ ब्रांच मलकापूर चा अभिनव उपक्रम जि. प. मराठी शाळा देवधाबा येथे केले स्वच्छता अभियान⭕

0
Spread the love

बुलढाणा समाचार 

गावातील नागरिकांनी केले निरंकारी सेवादलांचे कौतुक

प्रतिनीधि रविंद्र गव्हाळे मलकापुर

तालुक्यातील ग्रामदेवधाबा येथे संत निरंकारी मंडळाकडून भव्य स्वच्छता अभियान राबविण्यात आले यामध्ये संत निरंकारी ब्रांच मलकापूर मधील सर्व सेवा दल महात्मा उपस्थित होते सविस्तर माहिती अशी की प्रजासत्ताक दिन हा काही दिवसांवरच येऊन पोहोचला आहे. त्याच दिवसाचे औचित्य साधून आणि शाळेचे मुख्याध्यापक यांच्या विनंतीला मान ठेवून आज रविवार ला जिल्हा परिषद मराठी शाळा देवधाबा चा पूर्ण परिसरामध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले शाळेच्या संपूर्ण परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे गवत गावातील केरकचरा हा शाळेच्या गेट समोर मोठ्या प्रमाणात साचला होता व याकडे सर्वांचे दुर्लक्ष होत होते परंतु गावातील काही सेवादलांनी या घाणीकडे लक्ष देऊन आपण ही सेवा करायला हवी अशी मनामध्ये भावना निर्माण झाली व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याशी भेटून संत निरंकारी मंडळ हे सामाजिक उपक्रम राबवण्यामध्ये नेहमीच अग्रेसर असते यासंदर्भात माहिती दिली व त्यांनी क्षणाचा हा विलंब न करता स्वच्छता अभियान करण्यास परवानगी दिली व सर्व सेवादलानी उपस्थित राहून संपूर्ण परिसर स्वच्छ केला व कचऱ्याची योग्य प्रकारे विल्हेवाट लावली स्वच्छता अभियान मध्ये शाळेचे मुख्याध्यापक , गावातील प्रतिष्ठित नागरिक, पत्रकार, संत निरंकारी मंडळाचे प्रबंधक आदी मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed