बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याची आवाहन

0
Spread the love

, अनोळखी महिला मृतकाची ओळख पटविण्यास मदत करण्याचे आवाहन

बुलडाणा : बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अनोळखी महिला मृत अवस्थेत आढळून आली असून तिची ओळख पटविण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांना व नातेवाईकांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक १२ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास कक्षसेवक दिपक शालिग्राम निमकर्ड यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात माहिती दिली. सदर अनोळखी महिला (वय अंदाजे ६५ ते ६८ वर्षे) हिला दिव्या फाउंडेशन, बुलडाणा यांच्याकडून जिल्हा सामान्य रुग्णालय, बुलडाणा येथे अपघात विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

या प्रकरणी एम.एल.सी. क्रमांक ३४१६ नुसार बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात मर्ग क्रमांक ०२/२०२६, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे नोंद करण्यात आली आहे.

मृत महिलेचे वर्णन पुढीलप्रमाणे आहे –

लिंग : स्त्री

वय : अंदाजे ६५ ते ६८ वर्षे

उंची : सुमारे १६० से.मी.

बांधा : सडपातळ

रंग : सावळा

केस : पांढरे

ओळख : कपाळाच्या मध्यभागी टिकली गोंदलेली

वेशभूषा : लाल व पांढऱ्या रंगाचा गाऊन परिधान केलेला

सदर अनोळखी महिला मृतकाबाबत कोणालाही माहिती असल्यास किंवा नातेवाईकांनी पुढे येऊन संपर्क साधावा, असे आवाहन बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एस. एस. माळी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी तपासी अधिकारी (मो. क्र. ९८२३७१७०८०) किंवा बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed