मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी नवीन आराखडा तयार होणार

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

पालकमंत्री मकरंद पाटील यांची माहिती

सिंदखेडराजा, दि. १२ : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या ४२८ व्या जयंतीनिमित्त मातृतीर्थ सिंदखेडराजा येथे पालकमंत्री ना. मकरंद पाटील व सहपालकमंत्री ना. संजय सावकारे यांनी जिजाऊ माँसाहेब यांच्या जन्मस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री मकरंद पाटील यांनी मातृतीर्थ सिंदखेडराजा विकासासाठी नवीन सर्वांगीण आराखडा तयार करण्यात येणार असल्याची माहिती दिली.

राजमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्मस्थान हे प्रेरणादायी व ऐतिहासिक वारसा लाभलेले असून या पवित्र स्थळाला त्याचे गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी नव्या विकास आराखड्याची आखणी करण्यात येणार आहे. हा आराखडा शासनस्तरावर मंजुरीसाठी सादर करून त्याची प्रभावी अंमलबजावणी केली जाईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

या दौऱ्यादरम्यान पालकमंत्री मकरंद पाटील यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरील सिंदखेडराजा इंटरचेंज (फेज क्रमांक ७) येथे उभारण्यात येणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्याच्या प्रस्तावित जागेची पाहणी केली.

यावेळी आमदार मनोज कायदे, नगराध्यक्ष सौरभ तायडे, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, ॲड. नाझेर काझी, सातारा जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष नितीन भरगुडे पाटील, पुणे विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed