भाजप उमेदवारचे डिपॉझिट जप्त .बुलढाणा नगरपरिषदेवर शिवसेनेची एकहाती सत्ता.

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

पूजा संजय गायकवाड नगराध्यक्षपदी निवड

बुलढाणा, दि. 21 : बुलढाणा नगरपरिषद नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या पूजा संजय गायकवाड यांची निवड झाली असून नगरपरिषदेत शिवसेनेची एकहाती सत्ता प्रस्थापित झाली आहे. नगरपरिषदेतील एकूण 30 सदस्यांपैकी शिवसेनेचे तब्बल 22 सदस्य निवडून आले आहेत.

नगरपरिषदेतील इतर पक्षांची स्थिती अशी आहे : भाजप व काँग्रेसचे प्रत्येकी 2 सदस्य, तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि आघाडीचे प्रत्येकी 2 सदस्य निवडून आले आहेत.

नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीत पूजा संजय गायकवाड यांनी 18 हजार 525 मते मिळवत दणदणीत विजय मिळवला.

नगरपरिषदेच्या प्रभागनिहाय निकालात प्रभाग क्रमांक 1 अ मधून प्रशांत उत्तम जाधव (1428 मते) तर 1 ब मधून सपना अमित मावतवाल(1397 मते) विजयी झाल्या.

प्रभाग क्रमांक 2 अ मधून निसार खान इसाक खान(781) व 2 ब मधून परवीन मोहम्मद अजहर(1048) यांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक 3 अ मधून तमिजा बी युनूस खान (857) तर 3 ब मधून अनिल गणेश वर्मा(842) निवडून आले.

प्रभाग क्रमांक 4 अ मधून जाकीर हुसेन शेख कादर कुरैशी (1609) तर 4 ब मधून मुबशशेरा आयेशा अताउल्लाह खान(1558) यांनी यश संपादन केले.

प्रभाग क्रमांक 5 अ मधून सविताताई प्यारेलाल हडाले (1430) तर 5 ब मधून गजेंद्र शालीग्राम दांदडे (1708) विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 6 अ मधून वैशाली राहुल सुरडकर(1419) तर 6 ब मधून मृत्युंजय संजय गायकवाड (1437) निवडून आले.

प्रभाग क्रमांक 7 अ मधून सरला सुनील बरडे (1810) तर 7 ब मधून सतीश रामभाऊ बरडे (1510) यांनी विजय मिळवला.

प्रभाग क्रमांक 8 अ मधून वैशाली रामेश्वर वावरे (1238) तर 8 ब मधून सचिन विलास गायकवाड(1783) विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 9 अ मधून अशोक तुकाराम इंगळे (1109) तर 9 ब मधून देविता योगेश परसे (1190) निवडून आल्या.

प्रभाग क्रमांक 10 अ मधून इंदुबाई शामराव घट्टे (1303) तर 10 ब मधून विजय मधुकर जायभाये (1222) यांनी सदस्यपद पटकावले.

प्रभाग क्रमांक 11 अ मधून नयनप्रकाश सुखदेव शर्मा (761) तर 11 ब मधून निलम देवेंद्र खोत (805) विजयी झाल्या.

प्रभाग क्रमांक 12 अ मधून आकाश विजय दळवी (979) तर 12 ब मधून देवांगना अमित ठाकरे (993) यांनी यश मिळवले.

प्रभाग क्रमांक 13 अ मधून राखी विनोद बेंडवाल (1043) तर 13 ब मधून विनोद रमेश बेंडवाल (1154) निवडून आले.

प्रभाग क्रमांक 14 अ मधून मालती आश्रूबा शेवाळे (1300) तर 14 ब मधून सोहम पुरुषोत्तम झाल्टे (927) विजयी झाले.

प्रभाग क्रमांक 15 अ मधून पुष्पा शिवाजी धुड (1294) तर 15 ब मधून दीपक दशरथ सोनुने (1120) यांनी विजय संपादन केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed