बजरंग दलाच्या साहसी प्रयत्नामुळे विहिरीत पडलेल्या गाईचे प्राण वाचले

0
Spread the love

प्रतिनिधी – रविंद्र गव्हाळे, मलकापूर

मलकापूर (ता. १७ जुलै) मलकापूर तालुक्यातील घीर्णी परिसरात सुमारे ९० फूट खोल विहिरीत एक मोकाट गाय दुपारी ५ वाजण्याच्या सुमारास पडली. ही घटना स्थानिक गोप्रेमींना लक्षात येताच त्यांनी तात्काळ मलकापूर येथील बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना याची माहिती दिली.

बातमी मिळताच बजरंग दलाचे कार्यकर्ते घटनास्थळी धावले आणि विशेष प्रयत्न करून गाईला सुखरूप विहिरीतून बाहेर काढले. या कामात मंगेश सोनाने आणि कैलास घट्टे हे दोघे युवक दोरीच्या साहाय्याने विहिरीत उतरले. त्यांनी जीव धोक्यात घालून गाईला बाहेर काढले.

पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. भोळे यांनी घटनास्थळी येऊन गाईला प्रथमोपचार दिला. त्यानंतर तिला बेलाड येथील विद्यासागर गोरक्षण संस्थानमध्ये पाठवण्यात आले.

या प्रसंगी परिसरातील नागरिकांनी मंगेश सोनाने व कैलास घट्टे यांच्या धाडसाचे कौतुक केले.

बजरंग दलाचे प्रखंड संयोजक दीपक कपले यांनी सांगितले की, अशा प्रकारच्या घटना वारंवार होत असून नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने याकडे लक्ष द्यावे. मोकाट जनावरांमुळे जनावरे आणि माणसांचे प्राण धोक्यात येत आहेत. तसेच गौपालकांनी आपली जनावरे मोकाट सोडू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed