बुलढाणा येथे जिजामाता स्टेडियमवर योग दिन साजरा

0
Spread the love

बुलढाणा . अकरावा आंतरराष्ट्रीय योग दिन बुलढाणा येथील जिजामाता स्टेडियमवर उत्साहात साजरा करण्यात आला. “एक पृथ्वी, एक आरोग्य योगासाठी” या संकल्पनेवर आधारित या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी सहभाग घेतला.

कार्यक्रमाची सुरुवात संगीतमय योग सादरीकरणाने झाली, ज्याचे सादरीकरण क्षितिज निकम यांनी केले. त्यानंतर योग शिक्षिका अंजली परांजपे आणि योग शिक्षक प्रशांत लहासे यांनी योगाचे महत्त्व स्पष्ट करून उपस्थितांना विविध योगासने करून घेतली.

या कार्यक्रमात जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, विविध शासकीय विभागांचे अधिकारी, विद्यार्थी, महिला, लहान मुले आणि वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

डॉ. किरण पाटील यांनी बुलढाणा समाचार च्या कॅमेऱ्यासमोर प्रतिक्रिया देताना सांगितले की, “योग हे केवळ शारीरिक नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत उपयुक्त साधन आहे. सर्वांनी दररोज योगाचा अवलंब करावा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed