बुलढाणा | मिर्झा नगरला लागून झोपडपट्टी मध्ये भीषण आग, 3 घरे जळून खाक. आमदार तर्फे पीडित लोकांना दीड लाखांची मदत

0
Screenshot_2025-05-14-11-45-32-58_99c04817c0de5652397fc8b56c3b3817
Spread the love

बुलढाणा शहरातील झोपडपट्टी परिसरात मंगळवारच्या मध्यरात्रीनंतर अचानक लागलेल्या भीषण आगीत 3 घरे जळून खाक झाली आहेत. आग इतकी प्रचंड होती की तिने संपूर्ण वस्तीला हादरवून सोडले. प्राथमिक माहितीनुसार, ही आग रात्री अंदाजे दोन वाजेच्या सुमारास लागली आणि एका घरातून सुरू होऊन हळूहळू शेजारील घरांपर्यंत पसरली.

ही वस्ती डोंगरालगत असल्यामुळे आग आटोक्यात आणणे कठीण जात होते. आग विझवण्यासाठी बुलढाणा नगरपालिकेच्या दोन व चिखली येथून आणलेले एक अशा एकूण तीन अग्निशमन वाहनांनी सुमारे अडीच ते तीन तास शर्तीचे प्रयत्न करून अखेर आगीवर नियंत्रण मिळवले.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, घरसामान, साहित्य व इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अनेकांना वेळेवर बाहेर काढण्यात आले. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नसले तरी प्राथमिक अंदाजानुसार ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे सांगितले जात आहे.संबंधित यंत्रणांकडून नुकसानभरपाईसाठी पंचनामा करण्याचे काम सुरू आहे.

बुलढाणा मतदारसंघाचे आमदार संजय भाऊ गायकवाड यांनी पिढीतला पन्नास, पन्नास हजार रुपये , एकूण दीड लाखाची मदत केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed