आमदार संजुभाऊ गायकवाड यांच्या उपस्थितीत बंजारा समाजासोबत रंगोत्सव!

आमदार संजुभाऊ गायकवाड यांनी बुलढाणा येथील शिवसेना मातोश्री जनसंपर्क कार्यालयात बंजारा समाजातील माता-भगिनीं व बांधवांसोबत होळी उत्सव साजरा केला.
बंजारा समाजाने परंपरेनुसार पारंपरिक वादन आणि नृत्याने त्यांचे जिव्हाळ्याने स्वागत केले. यावेळी त्यांनी बंजारा समाज हा कुटुंबाचा अविभाज्य भाग असल्याचे सांगत, त्यांच्यासोबत होळी साजरी करण्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही, असे सांगितले.
यावेळी शिवसेना-युवासेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
