बुलढाणा लोणार परिसरात केशरी पळस बहरला.
उन्हाळ्याची चाहूल देत रंगाची उधळण पानगळ नंतर बहरून आले पळसाचे रूप ..- बुलढाणा जिल्ह्यातील लोणार परिसरात केशरी पळस बहरला आहे.. उन्हाळ्याची चांगले पळसाने आपल्या केसरी रंगाची उधळण केली आहे.. पानगळ नंतर पळसाचे मनमोहक रूप सर्वांना आकर्षित करत आहे. सूर्यप्रकाशात जणू अग्नी विस्तवाचे दर्शन घडवणाऱ्या या पळसाला चांगलाच फुलोरा आलाय… रंगपंचमी पूर्वीच या पळसाने नैसर्गिक रंगाची उधळण सुरू केली आहे.. त्यामुळे लोणार परिसराचे निसर्ग सौंदर्य आणखीनच खुलून गेले आहे.
