Screenshot_2025-01-01-11-26-44-59_680d03679600f7af0b4c700c6b270fe7
Spread the love

 

*बुलडाणा समाचार*बुलढाणा, दि.31* अलिकडच्या काळात देशाची तरूण पिढी वाचन संस्कृतीपासुन दुरावत असल्याचे दिसत आहे. या पिढीला प्रत्यक्ष ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी दि. 1 ते 15 जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यानिमित्त जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

हा उपक्रम विद्यापिठे, महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालय तसेच शासकीय ग्रंथालय यांच्या माध्यमातून दि.१ ते १५ जानेवारी दरम्यान राबविला जाणार आहे. या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय बुलढाणा येथे ग्रंथप्रदर्शन, सामुहिक वाचन, वाचन कौशल्य कार्यशाळा, वाचन संवाद, पुस्तक परीक्षण व कथन अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्येही वाचन पंधरवडा राबविण्यात येणार आहे.

जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, बुलढाणा येथील ग्रंथालयामध्ये आजमितीस सुमारे 1 लक्ष 60 हजार ग्रंथसंपदा उपलब्ध असून त्यामध्ये मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील विविधांगी कथासंग्रह, कादंबरी, संदर्भग्रंथ, ललित वाड:मय, स्पर्धा परीक्षा ग्रंथ इत्यादी ग्रंथसंपदा उपलब्ध असून वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमामध्ये जास्तीतजास्त वाचकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनिल पाटील यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed