उर्दू हायस्कूल जूनियर कॉलेज बुलढाणा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनी…
Oplus_131072


बुलढाणा: समाचार- बुलडाणा -:हे युग आता तंत्रज्ञान विज्ञानाचा झालेले आहे. विज्ञानामुळे जगातला कानाकोपऱ्यातला माहिती आता तंतोतंत मिळते. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आज दि 19 डिसेंबर रोजी उर्दू हायस्कूल ज्युनिअर कॉलेज बुलढाणा येथे भव्य विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी आपापल्या पद्धतीने आपले प्रोजेक्ट तयार केले आणि ते या विज्ञान प्रदर्शनी मध्ये सर्वांसमोर मांडले आहे. या विज्ञान प्रदर्शनी मध्ये वर्ग 5 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी भाग घेतला आहे.

या विज्ञान प्रदर्शनीचे उद्घाटन शाळेचे अध्यक्ष अ.रहीम सेठ यांच्या हस्ते करण्यात आले आहे. शाळेचे मुख्याध्यापक अख्तर बागवान सर.यांनी आपल्या भाषणांमध्ये विज्ञानाचे महत्त्व काय असते याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे संचालक दाऊद सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री जाकीर सर यांनी केले आहे.
यावेळी उर्दू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अ रहीम सेठ, सचिव सय्यद यासीन, सदस्य झकरिया सेठ,अ हमीद सेठ,मो समीर सेठ, उपमुख्याध्यापक दाऊद सर, पर्यवेक्षक यासर सर, शिक्षक व कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने या विज्ञान प्रदर्शनीला उपस्थित होते.
मुख्याध्यापक बागवान सरांनी बुलडाणा समाचार चे कैमेरा समोर आपली प्रतिक्रिया दिली
