6 ते 8 डिसेंबर दरम्यान जिल्ह्यात होणार तुरळक ठिकाणी पाऊस


बुलडाणा समाचार -:ढगाळ हवामानामुळे पिकांवर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता
बुलढाणा- बुलढाणा जिल्हा दिनांक सहा ते आठ डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी अगदी हलक्या च्या हलक्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवण्यात आली आहे.9 ते 10 डिसेंबर रोजी कोरडे हवामान राहण्याची शक्यता आहे तसेच यादरम्यान आकाश अशांत ढगाळ राहण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान खात्याने दिला आहे.
जिल्हा कृषी हवामान केंद्राद्वारे दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या ढगाळ हवामानामुळे पिकांवर रस शोषक किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे म्हणून या किडीच्या व्यवस्थापनासाठी लेबल क्लेम शिफारसीत कीडनाशकांचा कीटकनाशकांचा वापर फवारणीसाठी करण्यात यावा. हरभरा पिकाला ओलीत करताना संभाव्य पाऊस मान लक्षात घ्यावे तसेच अंतर मशागत करून पीक तनमुक्त ठेवावे. प्रत्येक वेचणीनंतर कापूस हा सावलीत वाळवून नंतरच साठवावा ओलसर जागेत साठवणूक केल्यास कापसाला पिऊसरपना येतो. त्यामुळे रुई आणि धाग्याची प्रत खालावते.
ओलीताखालील गहु पिकाची पेरणी बाकी असल्यास, लवकरात लवकर उरकून घ्यावी.पेरणीच्या वेळी बियाणे ५ ते ६ सेंमी. पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी घ्यावी.किमान तापमानातील अचानक बदलाने दुधाळ जनावरांच्या दुध उत्पादनात घट येऊ शकते. म्हणून दुधाळ जनावरांना प्रथिनयुक्त आहार द्यावा. अशी माहिती मनेश यदुलवार, कृषी हवामान तज्ञ, जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलढाणा. यांनी दिली आहे.
