संभाजी बिग्रेड चे तालुका अध्यक्ष राहुल संभारे तसेच जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे यांचा काँग्रेस मध्ये प्रवेश.

बुलडाणा समाचार
प्रतिनिधी रविंद्र गव्हाळे मलकापूर
मलकापुर :- आज दिनांक 9/4/2026 रोजी मलकापूर तालुक्यात राजकीय दृष्टीने महत्वाचे असणारी घटना म्हणजे संभाजी बिग्रेड चे तालुकाध्यक्ष राहुल संबारे तसेच संभाजी बिग्रेड जिल्हा प्रसिद्धी प्रमुख सुनील संबारे यांनी मलकापूर विधानसभा मतदार संघांचे माजी आमदार राजेश एकडे यांच्या मार्गदर्शनात आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. अरविंदजी कोलते यांच्या हस्ते बुलढाणा जिल्हा किसान काँग्रेस जिल्हाध्यक्ष संभाजी शिर्के यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.
या प्रवेशानंतर बोलत असताना संभाजी शिर्के यांच्या युवा नेतृत्वात आम्हाला कार्य करायचे असून काँग्रेस पक्षाची विचार धारा तरुणांना समजावून सांगत पक्षाला मजबुती देण्याचे काम येत्या काही दिवसात करायचा मानस यावेळी दोंघांनी सुद्धा बोलून दाखविला यांच्या प्रवेशामुळे निश्चित कॉग्रेस पक्षात युवकांचे संघटन वाढेल तसेच ग्रामीण पक्ष आणखी मजबूत होईल यात शंका नाही.
या पक्ष प्रवेशाच्या वेळी तालुकाध्यक्ष अनिल भारंबे, सचिन तायडे, रतन इंगळे, सुपडा ब्राम्हणे हे उपस्थित होते…
