संविधाननिर्माते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन 

0
Spread the love

बुलडाणा समाचार 

पृथ्वीवरतलावर आपल्या अमीट अशा पाऊल खुणा उमटवून गेले. समता स्वातंत्र्य न्याय बंधुता समाजात रूजवून विवेकवादी समताधिष्ठित समाज निर्मितीचे अशक्यप्राय असणारे व इतिहासात या पुर्वी कधीही घडले नाही असे महान कार्य डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अलौकिक बुद्धिमत्ता, कार्यप्रवणता आणि प्रबळ इच्छाशक्ती च्या बळाने करून इतिहास घडविला. कुत्र्या मांजरा पेक्षाही अत्यंत हालाकिचे, लाचारीचे जीवन जगणारा भारतातील बहुसंख्य समूह गुलामीच्या बेडीत जखडून ठेवण्यात आलेला होता. या समाजाच्या हाल अपेष्टा जुलूम अत्याचार बाबासाहेबांनी स्वतः पाहिले व अनुभवले.

आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनात अभूतपूर्व इतिहास घडविणारा हा महामानव, शिक्षण घेऊन जागतिक विद्वानांच्या रांगेत जाऊन बसला.

अशा या महामानवाची जयंती मोठ्या उत्साहात शाहू मल्टी सर्व्हिसेस बुलडाणा येथे साजरी केली. यावेळी इंजि. अशोक भोसले, डॉ बबन परमेश्वर, शिवसेना युवासेना उपजिल्हा प्रमुख प्रकाशभाऊ डोंगरे, इंजि. शिवाजी जोहरे, बीजेएन लाईव्ह चे संपादक समाधान चिंचोले, वसंत काकडे, गवई टेलर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed