श्री. माऊली हाॅस्पीटलमध्ये जागतिक होमिओपॅथी दिन साजरा नागरीकांना उष्माघात प्रतिबंधक औषधींचे मोफत वितरण_

बुलडाणा समाचार
बुलढाणा होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या जयंतीनिमित्त श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटल येथे जागतिक होमिओपॅथी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी ४० नागरीकांना उष्माघात प्रतिबंधक औषधींचे मोफत वितरण करण्यात आले.
दरवर्षी जगभरात १० एप्रिल रोजी डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांची जयंती होमिओपॅथिक दिन म्हणून साजरी करण्यात येते. यानिमित्त येथील श्री. माऊली होमिओपॅथिक हाॅस्पीटल येथे १० एप्रिल रोजी सकाळी बुलढाणा होमिओपॅथिक असोसिएशनचे अध्यक्ष व हाॅस्पीटलचे संचालक डॉ. दुर्गासिंग जाधव व सौ. निलिमा जाधव यांच्यावतीने अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जेष्ठ होमिओतज्ञ डॉ. ए.यु. शेख, दंततज्ञ डॉ. आशिष खासबागे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. सॅम्युएल हॅनिमन यांच्या प्रतिमेला उपस्थितांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी उपस्थित नागरिकांना डॉ. दुर्गासिंग जाधव यांच्याहस्ते उष्माघात प्रतिबंधक होमिओपॅथी औषधींचे मोफत वितरण करण्यात आले. डॉ. आशिष खासबागे यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. दुर्गासिंग जाधव यांनी होमिओपॅथीचे महत्व दिवसेंदिवस वाढत असून कोरोनाकाळात सर्वाधिक प्रभावी प्रतिबंधात्मक औषधी म्हणून होमिओपॅथीने आपली उपयुक्तता सिद्ध केल्याचेही डॉ. जाधव यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सागर जोशी यांनी केले. डॉ. पवन बजाज यांनी आभार मानले. कार्यक्रमाला डॉ. अशोक बडगुजर, डॉ. सौ. दीपाली जोशी, डॉ. सौ. निलिमा जाधव, डॉ. दीपक बढे, डॉ. गणेश वसू, डॉ. उमेश जाधव, डॉ.सौ. जागृती खरे, ॲड. सौरभ ढगे, गणेशसिंग जाधव, पुरुषोत्तम लोठे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर सोळंकी, शौर्य जाधव, वेदश्री जोशी, काव्या जाधव यांनी परीश्रम घेतले.
कॅप्शन १) नागरीकांना उष्माघात प्रतिबंधक औषधीचे वाटप करताना डॉ. दुर्गासिंग जाधव
कॅप्शन २): डॉ. हॅनिमन यांना जयंतीनिमित्त अभिवादन प्रसंगी उपस्थित होमिओ तज्ञ
